संतापजनक…! अकरा वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन नरधमाने केला अत्याचार! धाड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…

सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही....

धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गावातील ११ वर्षीय मुलीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीने घाबरत आपल्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी धाड पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० जून रोजी पीडित मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती.

सायंकाळी ५ वाजता घरी परतल्यावर तिची ११ वर्षीय मुलगी रडत तिच्याकडे आली. आईने विचारले असता, मुलीने सांगितले की, गावातील एका मुलाने तिला ऑटोरिक्षात ओढून गैरवर्तन केले. आरोपीने तिचा हात ओढला, तिच्या अंगाला स्पर्श केला, कपडे काढले आणि संवेदनशील अवयवांना हात लावला. मुलगी रडू लागल्यावर आरोपीने “कोणाला सांगितले तर जीव घेईन” अशी धमकी देऊन तिला पळवून लावले.

पीडितेच्या आईने तात्काळ आरोपीची माहिती काढली. आरोपी हा मूळचा देहड (ता. भोकरदन, जि. जालना) येथील असून, सध्या म्हसला गावात राहणारा १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. आईने आरोपीच्या घरी जाऊन विचारणा केली असता, पीडित मुलीने त्याला ओळखले आणि त्यानेच अत्याचार केल्याचे सांगितले. आरोपीने यावेळी आईला शिवीगाळ करत धमकावले.

यानंतर आईने धाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा नोंदवला. आरोपीला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर केले आहे. सध्या ठाणेदार आशिष चेचेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
WhatsApp Join Group!