मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दरेगाव येथे दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याला अतिसाराची साथ म्हणणे चुकीचे असून, विरोधकांनी प्रसारमाध्यमांद्वारे पसरवलेली ही अफवा असल्याचा दावा सरपंच पती रवि मांटे यांनी केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, साखर खेर्डा येथील वैद्यकीय पथकाने गावातील पाण्याच्या विहिरी आणि रुग्णांची तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.
खाणारा म्हणतो वातड कशी? या म्हणी प्रमाणे दरेगाव येथील आजी/माजी सरपंची श्रेय वाद लढाई सूरू असून त्यात प्ररसार माध्यमातून अतिसार लागण ची बातमी झळकताच प्राथमिक आरोग्य केंद्र साखर खेर्डा येथील डॉक्टरांनी पाण्याची व पेशंट ची तपासणी केली असता त्यात पोटदुखी संडास लागण्याची लक्षणे दिसून आले.
साखर खेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने दरेगावात भेट देऊन गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तपासणी केली. तसेच, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणून घेतल्या. काही नागरिकांनी सांगितले की, विहिरीत जास्त प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकल्याने पोटदुखी आणि जुलाब यासारखी लक्षणे जाणवत आहेत. वैद्यकीय पथकाच्या तपासणीत असे दिसून आले की, पावसाळ्यामुळे जमिनीत जिरणारे दूषित पाणी विहिरीत मिसळत आहे, ज्यामुळे पाणी दूषित झाले आहे. यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे. मात्र, अतिसाराची लक्षणे जसे की उलट्या होणे किंवा ताप येणे यापैकी कोणतीही लक्षणे रुग्णांमध्ये आढळली नाहीत.
मायलेकींना यातनागृहात डांबून ठेऊन तो करत होता अमानुष अत्याचार; भोंदू बाबाचा अघोरी कृत्याचा पर्दाफाश
ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना प्रत्येक विहिरीत किमान 600 ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाकण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. वैद्यकीय पथकाने शनिवार ते मंगळवार या कालावधीत गावात तीन दिवसांचा विशेष आरोग्य शिबिर आयोजित केला होता. या शिबिरात रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. मंगळवारी प्राप्त माहितीनुसार, जुलाबाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तरीही, पोटदुखी किंवा जुलाब यासारखी लक्षणे असलेल्या नागरिकांनी तातडीने साखर खेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन सरपंच पती रवि मांटे यांनी केले आहे.
खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…
दरेगावातील ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम सतत कार्यरत आहे. गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच प्यावे, अशी सूचना आरोग्य पथकाने केली आहे. यासोबतच, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून पुढील उपाययोजना करत आहे, जेणेकरून अशा समस्या भविष्यात उद्भवणार नाहीत.