
Crop Insurance News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने खरीप २०२२ पासून प्रलंबित असलेल्या पीक विमा भरपाईच्या वाटपासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना २,८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली असून, यामुळे तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरीप हंगाम २०२४ मधील पिक विम्याची तब्बल २,८५२ कोटी रुपयांची भरपाई मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने या रकमेच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
हे देखील वाचा- Womens Day Special: यूट्यूबवरून महिन्याला ५ ते ६ लाख रुपये कमावणाऱ्या सुमन आजींची गोष्ट, ७४ वर्षीय आजींचा प्रेरणादायी प्रवास
खरीप हंगामात विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार वेगवेगळ्या ट्रिगरअंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे ३ लाख शेतकऱ्यांना १,४५५ कोटींची भरपाई मंजूर झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे १८.८४ लाख शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये मिळणार आहेत.
तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १.४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी १.३३ लाख शेतकऱ्यांना १३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. यापैकी काही रक्कम आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, ५४ लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती, आणि ही भरपाई एकूण २,३०८ कोटी रुपये होती.
हे देखील वाचा- Shet Rasta Niyam: शेतकऱ्यांनो, कोणाचा बाप तुमचा रस्ता अडवू शकणार नाही! ‘या’ कायद्यानुसार मिळवा शेतरस्ता, जाणून घ्या प्रक्रिया
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्यामुळे खरिपातील २,३०८ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत ती पूर्णतः जमा केली जाईल, असे कृषी विभागाने सांगितले.
खरीप हंगामातील निश्चित झालेली संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या कोणत्याही पूर्वसूचना आलेल्या नाहीत. मागील आठवड्यात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला असला तरी काही प्रमाणात नुकसानाच्या सूचना आल्या आहेत. मात्र, चालू रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले नसल्याने मोठी भरपाई मिळण्याची शक्यता नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
– बुलढाणा कव्हरेज न्यूज
📌 संदर्भ: