चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज….

चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज….

चिखली (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने ५ मार्च २०२५, १३ व १६ जून २०२५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ३० (४) (५) अन्वये तसेच रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५ ते २०३० दरम्यान चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण १६ एप्रिल २०२५ रोजी चिखली येथे पार पडले होते.

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

परंतु ते काढलेले आरक्षण रद्द करून ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नविन १३ व १६ जून २०२५ रॊजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या १७ जून २०२५ रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत बुधवार ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता मा. उपविभागीय अधिकारी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय चिखली कार्यालय येथे सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.

या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या चिखली तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेस सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व संबधित नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या वतीने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!