चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या दोन दिवसांपासून चिखली तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखली शहर आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गरीब कुटुंबांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या असून, शेकडो एकर शेती नदीच्या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! 293 नागरिक पाण्यात अडकले, काय आहे पूरस्थिती?
या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, या पावसामुळे त्यांच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे आणि शेतजमिनींची धूप झाल्याने पुढील हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत आणि नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत तसेच पुनर्वसनासाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.
















1 thought on “चिखली तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांची त्वरित मदत आणि पंचनाम्याची मागणी”