चिखलीतील ब्रिटिशकालीन इमारत पाडकाम प्रकरणी ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी!

चिखलीतील ब्रिटिशकालीन इमारत पाडकाम प्रकरणी ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहाच्या पाडकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणाच्या विरोधात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने प्रशासनाला खडबडून जागे केले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

जालना येथील तरुणाची अपहरणानंतर क्रूर हत्या; मृतदेह बुलडाणा जिल्ह्यात फेकला

या इमारतीच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, काम सुरू होताच अभियंत्यांनी कोणतेही ठोस कारण न देता इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इमारत पाडण्याची गरज होतीच, तर मग एवढा मोठा निधी मंजूर का करण्यात आला?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

रात्रीच्या अंधारात परवानगीशिवाय पाडकाम?

या इमारतीचे बांधकाम कंत्राट ‘स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला देण्यात आले होते. परंतु, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रात्रीच्या वेळी इमारत पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शासकीय आदेश, पंचनामा किंवा पाडकामाचे सुसंगत कारण याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवली असून, या प्रकरणात जबाबदार असलेल्या अभियंते आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. “ही ऐतिहासिक इमारत आमच्या सांस्कृतिक वारसाचा भाग होती. तिचे पाडकाम हा केवळ गुन्हा नाही, तर आमच्या इतिहासावर घाला आहे,” असे सरनाईक यांनी ठणकावून सांगितले.

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात अद्याप कोणतीही चौकशी सुरू न झाल्याने आंदोलकांनी प्रशासनावर दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. आंदोलनादरम्यान बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. अखेर, कार्यकारी अभियंत्यांनी तीन दिवसांत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. परंतु, जर ठोस कारवाई झाली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

या चार तास चाललेल्या ठिय्या आंदोलनात विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भगवान मोरे, अरुण नेमाणे, नवलसिंग मोरे, प्रकाश तायडे, सुधाकर शेळके, गजानन तोरमल, बाळू पाटील, सुनील वायाळ, ज्ञानेश्वर मोरे, अमोल मोरे, गोपीनाथ डुकरे यांच्यासह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाने प्रशासनाला हादरवून सोडले असून, स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत तीव्र संताप आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “चिखलीतील ब्रिटिशकालीन इमारत पाडकाम प्रकरणी ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!