चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — चिखली शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या संवाद बैठकींना प्रभाग क्र. ९ आणि १० मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी दिलेल्या मनमोकळ्या प्रतिसादाने आणि विजयाच्या ग्वाहीने उमेदवारांचे मनोबल उंचावले असून आगामी निवडणुकीत भाजपला दृढ पाठबळ मिळणार असल्याचे चित्र उमटले आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील संवाद बैठकीत नागरिकांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवकपदाचे अधिकृत उमेदवार श्री. गुरुदत्त सुसर आणि सौ. ज्योतीताई वाळेकर यांच्याबद्दल प्रचंड विश्वास व्यक्त केला. चिखलीच्या विकासासाठी केलेल्या वचनांवर नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विकासाची गरज अधोरेखित केली.
यानंतर प्रभाग १० मधील बैठकीतही नागरिकांकडून तितकाच उत्साही प्रतिसाद मिळाला. नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. भारत पवार आणि सौ. रेणुका भुतेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत शहराच्या सातत्यपूर्ण आणि वेगवान विकासाचा निश्चय पुन्हा व्यक्त करण्यात आला.
रस्ते, पाणी, स्वच्छता आणि शहर विस्तार यांसह अनेक महत्त्वाच्या विकास कामांना गती देण्याची क्षमता भाजपकडे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. देश, राज्य आणि स्थानिक स्तरावर समन्वयाने विकास साधण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाकडेच असल्याचेही बैठकीत ठळकपणे समोर आले.
चिखलीकरांनी दाखवलेला विश्वास हीच खरी ताकद असून, या पाठिंब्याच्या जोरावर चिखलीच्या बदलाची नवी वाट उघडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













