श्री रेणुका देवी यात्रेत भक्तांचा उत्साह; वगदी मिरवणुकीने शहरात जल्लोष! आमदार श्वेता ताई महाले यांच्या हस्ते प्रसाद वाटप..

चिखली (राजेश लोखंडे, बुलडाणा कव्हरेज न्युज): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व चिखली शहराच्या ग्रामदैवत असलेल्या श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त मंगळवारी शहरात मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक पार पडली. शेलूद येथील मानाची वगदी सकाळी ९.३० वाजता राऊतवाडी भागातून निघाली. त्यानंतर शहरातील विविध भागांमधून इतर वगद्या देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने निघाल्या.

वगदीवर आपल्या मुलांना बसवून भाविकांनी नवस फेडले. शहरातील हमालपुरा, माळीपुरा, देशमुखपुरा भागांतील वगद्या ठराविक मार्गक्रमण करत मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी सज्ज झाल्या. पहाटे दोन वाजताच शेलूद येथील मानाचे पातळ देवीच्या मंदिरात नेण्यात आले. वाजतगाजत झालेल्या या मिरवणुकीस हजारो भाविकांची उपस्थिती लाभली होती.राऊतवाडीत वगदीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांची उपस्थितीही यंदा विशेष लक्षणीय होती.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजारो भाविक यात्रेसाठी एक दिवस आधीच चिखलीत दाखल झाले होते.सांस्कृतिक उत्सवात भक्तीचा ओघयात्रेनिमित्त शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. राजा टॉवर परिसरात विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. प्रसाद, खेळणी, पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ आदी वस्तूंसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.शहरातील विविध मंडळे, महिला संघटना, व्यापारी, हमाल संघटना, बाजार समितीचे कर्मचारी आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी यांनी देवीला पातळ अर्पण केले.

Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…

एसटी कर्मचारी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाद्यांच्या तालावर नाचत पातळ अर्पण करताना दिसले. यात्रोत्सवात ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले. पोळी-भाजी, बुंदी, खिचडी यांचा भाविकांनी मनमुराद आस्वाद घेतला.लोकप्रतिनिधींचा सहभाग..स्थानिक आमदार श्वेता महाले यांनी रिक्षा स्थानकाजवळ स्वतः हाताने भाविकांना प्रसाद वाटप केला. चिखली येथील एसटी स्थानक, जे जिल्ह्यातील सर्वात मोठं मानलं जातं, तेथूनही भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले. आई रेणुका मातेसाठी सर्वत्र भक्तिभावाने ओसंडून वाहणारा उत्सव यंदाही यशस्वीपणे पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!