चिखली नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे द्या.शहराच्या विकासाचाची जबाबदारी मी घेतो.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिखलीकरांना आवाहन….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार प्राचार्य डॉ निलेश गावंडे यांच्याकडे सोपवा, चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो त्यांसाठी गावंडे सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चिखली राजा टॉवर येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘परिवर्तन सभेला’ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. युवक, महिला, विविध समाजघटकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.यावेळी आ. मनोज कायंदे, आ. संजय खोडके, आ. अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव गजानन पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, सुभाष देव्हडे, तालुका अध्यक्ष संतोष परीहार, शहराध्यक्ष तुषार बोंद्रे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे , शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, कपिल खेडेकर तालुकाप्रमुख गजानन मोरे ,नेते रोहित खेडेकर शहर प्रमुख विलास घोलप, संतोष लोखंडे, बंडू इरफान अली, वसीम शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)–शिवसेना महायुतीच्या संयुक्त आयोजनात झालेल्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले,“चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. निलेश गावंडे यांना निवडून द्या. घाबरू नका… राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” चिखलीतील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “जनतेची सेवा करता येत नसेल, तर राजकारणात राहण्याचा कोणालाही अधिकार नाही,” असा टोला लगावत.पेनटाकळी प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षित व्यवस्था असताना सुद्धा चिखलीतील जनतेला पंधरा पंधरा दिवस स्वच्छ पाणी मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले मी विकासाला पाठबळ देणारा व्यक्ती आहे निधीची कमतरता पडणार नाही . केंद्राचा निधी, नगरविकास मंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथराव शिंदे यांच्या निधी राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी स्वतः व पालकमंत्री म्हणून मकरंद आबा यांच्या माध्यमातून चिखलीचा विकास साधू आतापर्यंत इतरांना संधी देऊन बघितली आता आम्हाला संधी देऊन बघा मी कामाचा माणूस आहे शब्दाचा पक्का आहे आणि विशेष म्हणजे चांगला कार्यकर्ता हेरणारा माणूस आहे यापूर्वी सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये मनोज कायंदे यांना हेरल आणि आमदार बनवलं आता डॉक्टर निलेश गावंडे यांना हेरल आहे त्याना तुम्ही नगराध्यक्ष बनवा त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असा शब्द त्यांनी चिखलीकारांना दिला.सर्वसमावेशक विकासाचा संदेश…. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत अजितदादा म्हणाले, “महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभारलं. त्याच धर्तीवर चिखलीचा विकास सर्व समाजघटकांना सोबत घेऊन करायचा आहे.” सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने होणार नाही व प्रशासनाला एकतर्फी वागून चालणार नाही कायदा सर्वांसाठी समान आहे प्रशासकीय यंत्रणेचा धाक दाखवून. अतिक्रमण काढून कोणी गौरगरिबांच्या पोटावर पाय देत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे सत्तेमध्ये कोणी तांब्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. जनता जनार्धन सर्वस्व आहेत. असा ईशारा त्यांनी विरोधकांना दिला . सभेला मुस्लिम, बहुजन, मराठा, ओबीसी, हिंदी भाषिक आदी समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कटपुतली म्हणून नव्हे तर स्वतंत्र विचाराने काम करेल – प्राचार्य निलेश गावंडे या परिवर्तन सभेत आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे म्हणाले, “शिक्षक म्हणून मी आजवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, आता चिखली शहराचे आधुनिक आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. या निर्धार आला आपण मतदान आरोपी आशीर्वाद देऊन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बहुमोल सहकार्य करावे असे भावनिक आवाहन प्राचार्य निलेश गावंडे यांनी यावेळी बोलताना केले. शिक्षण, रोजगारनिर्मिती, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सेवा उपलब्ध करणे हे स्वतःच्या प्राधान्यक्रमात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मी अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये आहे पण मला भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नाही पुढेही मी ठेकेदारी करणार नाही . मी स्वतंत्र विचाराचा माणूस असून कटपुतली म्हणून वागणारा नाही प्रामाणिकपणे जनतेचे कामे करेल व चिखलीला भय आणि भ्रष्टाचार मुक्त करेलअसे आश्वासन चिखलीकरांना दिले. यावेळी मंचकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!