चिखली (ऋषि भोपळे :बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली शहरात भाजप पक्षात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जोरदार लगबग सुरू झाली आहे. अनेक कार्यकर्ते या पदासाठी तयारी करत असून, घराघरांत भेटीगाठी घेतल्या जात असून जोरदार राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.भाजपचे माजी शहराध्यक्ष पंडित दादा देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.आमदार सौ रेखाताई खेडेकर पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या सोबतही ते खंबीरपणे उभे असतात त्यामुळे त्यांना सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानले जात आहेत. त्यांनीही जनतेत जाऊन भेटीगाठी वाढवायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे सौ. संध्याताई कोठारी या देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून भाजपाचे जेष्ठ नेते विजयकुमार कोठारी यांच्या त्या धर्मपत्नी आहेत गेली ४० ते४५ वर्षांपासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड जनसंपर्क आहे विशेषतः शहरातील अनेक महिलाना त्या नावासह ओळ्खतात यावेळी त्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार असून त्यांनी जोरदार तयारी करीत पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.
तिसरे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुहास शेटे असून त्यानी सुद्धा भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे चिखली भाजपमध्ये आता “पंडित दादा देशमुख , डॉ संध्या ताई कोठारी की सुहास शेटे?” अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, बुलडाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “बुलडाण्यात भाजप आणि चिखलीत शिवसेना (शिंदे गट)” यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी.त्यामुळे जर कदाचित युती कायम राहिलीच, तर चिखली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाईल की शिवसेना भाजपला पाठींबा देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने शिवसेनेचे स्थानिक नेत्यामध्ये नवचैतन्य पसरले आहे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी विलास घोलप यांचे नाव पुढे केले आहे मात्र ते होणे तितके शक्य नसल्याचे राजकीय जानकराचे मत आहे. महायुती होते का? की भाजप स्वतंत्र रिंगणात उतरतो?हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल…
















