नगरपरिषद निवडणुकीचा पहिला ड्राय डे..; एकही उमेदवार पुढे आला नाही!ऑनलाईन नामांकन प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक – राजकारणात ‘वेट अँड वॉच’चा खेळ सुरू

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी (१० नोव्हेंबर) अधिकृतपणे सुरू झाली असली तरी, पहिल्याच दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या साइटवर शांतता होती. एकही उमेदवार — ना नगराध्यक्षपदासाठी, ना नगरसेवकपदासाठी — ऑनलाईन नामांकन भरताना दिसला नाही. पहिला दिवस अक्षरशः ‘ठणाठण कोरडा’ गेला.राजकीय वर्तुळात सध्या फक्त ‘वेट अँड वॉच’ चीच स्थिती दिसते आहे. कोण कुणासोबत जाणार, याचे गणित अजून बसलेले नाही. काही ठिकाणी आरक्षणामुळे नेत्यांचा हिरमोड झाला असून, पक्षीय समीकरणे अजून तयार होत आहेत. त्यामुळे स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवार प्रतिक्षेतच आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील चर्चा अजून सुरू आहे. वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिले असल्याने, कोणत्या पक्षातून कोण उतरणार, हे निश्चित व्हायचे बाकी आहे.अमानत रक्कम किती?नगरपरिषद निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांना ठराविक अमानत रक्कम भरावी लागणार आहे –‘अ’ वर्ग नगरपरिषद: सर्वसाधारण उमेदवार ₹३,०००; राखीव/महिला उमेदवार ₹१,५००‘ब’ वर्ग नगरपरिषद: सर्वसाधारण ₹२,०००; राखीव/महिला ₹१,०००‘क’ वर्ग नगरपरिषद: सर्वसाधारण ₹१,०००; राखीव/महिला ₹५००नगरपालिकांना ‘स्थानिक नेतृत्वाची जननी’ म्हटले जाते. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड तब्बल ३५ वर्षे नगरसेवक राहिले, हे याचं उदाहरण. परंतु यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांची गुंतागुंत आणि आरक्षणाच्या फेऱ्यांमुळे पहिलाच दिवस निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्ण शांत ठरला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!