चिखली ( बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखलीतील नगरपरिषद निवडणुकीत यंदा नागरिकांचा कल स्पष्टपणे भयमुक्त, पारदर्शक आणि सर्वांसाठी न्याय देणाऱ्या प्रशासनाकडे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेली दडपशाही, राजकीय सूडबुद्धी आणि ठप्प विकास यामुळे मतदार बदलाची मागणी जोरात करत आहेत.या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्याबद्दल जनतेमध्ये उत्साह प्रचंड वाढला आहे. शहरातील कॉर्नर मीटिंग्स, प्रचारसभा आणि घराघरातील चर्चांमध्ये “भयमुक्त चिखली हवी!” हे वाक्य जोरात घुमत आहे.महाविकास आघाडीने दिलेला संदेश —पारदर्शक कारभार, सूडमुक्त प्रशासन, सर्वांसाठी विकास आणि नागरिकांच्या सन्मानाची हमी —हा शहरवासीयांना भावला असून सर्व प्रभागांतून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.तरुण, महिला, व्यापारी, कामगार अशा सर्वच घटकांकडून आघाडीच्या उमेदवारांना चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस महाविकास आघाडीच्या बाजूने फिरताना दिसत आहे.चिखलीत बोंद्रे यांचीच लाट!भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा झाल्या, मात्र त्यांचा जनमानसावर काहीच परिणाम झाला नाही. उलट शहरात काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नावाचीच क्रेज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.चिखलीकर एकच सांगत आहेत .“संकटाच्या वेळी साथ देणारा, मदतीचा हात देणारा नेता हवा… आणि ते नाव म्हणजे काशिनाथ आप्पा बोंद्रे!”
“चिखलीत जनतेचा एकमुखी नारा; भयमुक्त शहरासाठी आता काशिनाथ आप्पा बोंद्रेच. !”













