चिखली शहरात काँग्रेसचा जोरदार प्रचार; नगराध्यक्षपदाचे उमेदवार काशिनाथ बोंद्रे चर्चेत..!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — चिखली शहराचा कायापालट करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ अप्पा बोंद्रे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला
शहरात ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या सक्रिय प्रचारामुळे चिखलीत नवीन चर्चा रंगू लागली आहे.

शहरातील नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता—
“काशिनाथ बोंद्रे शिवाय चिखलीला दुसरा पर्याय नाही” अशी चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.

प्रचारादरम्यान बोंद्रे यांनी चिखली शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा सुधारणा आणि शहराचा काया पालट करण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्या या आश्वासनांमुळे आणि जनसंपर्कामुळे काँग्रेसचा प्रचार अधिक जोरदार होताना दिसत आहे.

चिखलीतील राजकीय वातावरणात या निवडणुकीमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!