बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि समाजात आदर्श निर्माण होतो. या विचाराने प्रेरित होऊन भारतीय स्टेट बँकेच्या बुलडाणा मुख्य शाखेतर्फे दिनांक 27 जून 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला बँकेचे शाखा व्यवस्थापक धिरेंद्रकुमार झा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
BREAKING: बुलडाणा जिल्हा हादरला! आठ दिवसात दुसरी घटना; मलकापुरात पत्नी आणि मुलाने मिळून केला मर्डर!
या रक्तदान शिबिरात बँकेचे कर्मचारी, ग्राहक, सामान्य नागरिक तसेच स्थानिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात प्रमाणपत्र वितरण आणि बक्षीस समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक धिरेंद्रकुमार झा, उबाठा शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रकाशभाऊ डोंगरे, बीजेएन लाईव्ह न्यूजचे संपादक समाधान चिंचोले, आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव जावळे पाटील, स्वप्नील गवई, तुषार लोखंडे यांच्यासह प्रकाश फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याने आपल्या योगदानाने मानवतेची सेवा केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होते आणि गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध होऊ शकते.