डॉक्टरचे अपहरण; तीन लाखांची खंडणी उकळून डॉक्टरांचा थरारक पलायन प्रवास…

चिखलीत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना; बाप-लेक गंभीर जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

देऊळगाव राजा (गणेश मुंडे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा शहरातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. जयश मिनासे यांचे ८ मे २०२५ रोजी संध्याकाळी अज्ञात तिघांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली. या गुन्हेगारांनी डॉक्टरांकडून सुमारे तीन लाख रुपये खंडणी उकळली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, डॉ. मिनासे यांनी प्रसंगावधान राखत आरोपींच्या तावडीतून पलायन करत आपला जीव वाचवला.

काय घडले नेमके?

८ मे रोजी संध्याकाळी डॉ. मिनासे आपल्या दवाखान्यातून दुचाकीवरून घरी निघाले होते. शहरातील रामणे कॉम्प्लेक्सजवळ अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर आली. गाडीतून खाली उतरलेल्या तीन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा टोलनाक्याजवळ नेले. तिथे त्यांनी डॉक्टरांकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.

वाढदिवसाला जल्लोष नको – शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उपोषण!रविकांत तुपकर १३ मे रोजी कुटुंबासह घराच्या अंगणात करणार अन्नत्याग….

डॉ. मिनासे घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांनी आरोपींना दोन लाख रुपये रोख, ९८ हजार रुपये यूपीआयद्वारे, खिशातील दोन हजार रुपये आणि १० हजारांचा मोबाईल दिला. तरीही आरोपींनी त्यांना धमकावणे सुरूच ठेवले. या गंभीर परिस्थितीत डॉ. मिनासे यांनी हुशारी दाखवली. त्यांनी नैसर्गिक विधीचे कारण सांगत आरोपींची नजर चुकवली आणि संधी साधून जवळच्या अंधाऱ्या भागात पळ काढला.

पोलिसांत तक्रार आणि तपास

सुटका झाल्यानंतर ९ मे रोजी रात्री डॉ. मिनासे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून तिन्ही अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा केला आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “डॉक्टरचे अपहरण; तीन लाखांची खंडणी उकळून डॉक्टरांचा थरारक पलायन प्रवास…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!