विकसित भारताचा संकल्प आपणच सिद्धीस नेऊ!… आ. सौ. श्वेताताई महाले; भाजपा अमडापूर मंडळाची कार्यकारणी जाहीर…

विकसित भारताचा संकल्प आपणच सिद्धीस नेऊ!… आ. सौ. श्वेताताई महाले.भाजपा अमडापूर मंडळाची कार्यकारणी जाहीर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): भाजपाची तालुका कार्यकारणी आज मंडळनिहाय घोषित करण्यात आली. यावर्षी पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या अमडापूर मंडळामध्ये नवीन कार्यकारिणीचे अमडापूर मंडळ अध्यक्ष श्री अमोल साठे यांच्या नेतृत्वात व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

 चिखली तालुका भाजपाच्या वतीने आयोजित संकल्प सिद्धी तक ही तालुकास्तरीय कार्यशाळा अमलापुर येथील श्री बल्लाळ देवी संस्थान या ठिकाणी उत्साहात पार पडली. यावेळी मंचकावर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये अमडापूर मंडळ अध्यक्ष श्री अमोल साठे यांनी नवीन कार्यकारणीची यादी जाहीर केली, भाजपा तालुका सरचिटणीस श्री सतीश काळे, भाजपा तालुका युवा कार्यकारणी अध्यक्ष श्री बंडूभाऊ अंभोरे यांच्यासह अमडापूर मंडळ तालुका उपाध्यक्ष व तालुका कार्यकारणी सदस्य यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?

आ. सौ. श्वेताताई महाले यांनी या सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व ‘संकल्प से सिद्धी तक’ हे अभियान राबवण्याचे आवाहन केले.

आगामी निवडणुकीसाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील महायुतीचे सरकार यांनी केलेल्या कामांची माहिती द्यावी, येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागावे, पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहचवावी, प्रत्येक बूथवर कार्यक्रम राबवावे, नव्या शाखांचे अनावरण करावे, सर्व आघाड्या गठित कराव्या, प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, सरकारने केलेल्या कामगिरीबाबत जनजागृती करावी, प्रत्येक मंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे.

नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतवर आपल्याला भाजपा महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. त्या दृष्टीने तयारीला लागावे.असे आवाहन सर्व उपस्थितांना सौ. श्वेताताई महाले यांनी केले.

मोठी बातमी! बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक लवकरच! प्रभाग रचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, आता ६१ जागांसाठीच निवडणूक निश्चित!

 मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभी आहे. कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा प्रमुख घटक आहे. आपली पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कधी नव्हे एवढी विकासकामे आपल्या चिखली मतदारसंघात खेचून आणली गेली आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासह दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही अधिक गतीने काम करण्याचा निर्धार या प्रसंगी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.

या वेळी व्यासपीठावर सर्वश्री विजयराज शिंदे (जिल्हाध्यक्ष, भाजपा, बुलढाणा), ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), 

EXCLUSIVE..तिकीट कुणाला? निष्ठावंत कार्यकर्ते की नवीन चेहरे?

प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. श्री. प्रतापसिंग राजपुत, साहेबराव पाटील सोळंकी, शिवाजीराव कुटे, डाॅ. दामोदर भवर, किशोर जामदार, श्यामभाऊ वाकदकर, मंडळ अध्यक्ष डाॅ. कृष्णकुमार सपकाळ, सुधाकर सुरडकर, चंद्रकांत बर्डे (जिल्हा संयोजक), सौ. ललिताताई माळोदे (माजी सरपंच), जितेंद्रजी कलंत्री (माजी उपसभापती), संजयजी महाले, संजयजी गाडेकर, सौ. सावित्रीबाई राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेसाठी मंडळ अध्यक्ष सर्वश्री अमोल साठे, युवा मोर्चा अध्यक्ष बंडूभाऊ अंभोरे, मंडळ संयोजक प्रशांत पाखरे, सहसंयोजक सुनील राठोड आणि नंदकिशोर गुंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!