चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेळगाव आटोळ सर्कलमध्ये काल आणि आज अशा दीर्घ संघर्षातून भारतीय जनता पक्षासाठी सातत्याने काम करणारे भाजपचे सर्कल नेते विष्णु घुबे यांचा आज वाढदिवस आहे. ज्या दिवसापासून त्यांनी भाजप पक्षात काम सुरू केले, त्या दिवसापासून आजपर्यंत सत्ता असो वा नसो, कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी या मतदारसंघात अतिशय प्रामाणिकपणे पक्षकार्य केले आहे.

जाहिरात….👆
पक्ष उभा करण्याच्या काळापासून ते आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली असून त्यांचे कार्य आजही सुरूच आहे.वायफळ खर्च टाळून समाजाचा विचार केंद्रस्थानी ठेवत, वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी विष्णु घुबे यांनी शेळगाव आटोळ सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.राजकारणासोबत समाजकारण जपणारा हा उपक्रम ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत असून पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सत्तेच्या राजकारणापेक्षा सेवा आणि समाजहिताला प्राधान्य देणारे विष्णु घुबे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.














