BIG BREAKING : दोन जुळ्या मुलींचा खून! बापाने रागाच्या भरात केली अमानुष कृती…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण (पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा) याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची घटना उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरी जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. त्यात संतापलेल्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल मुलींना घेऊन पुढे निघाला. रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा जवळील जंगलात आपल्या दोन मुलींचा गळा कापून निर्दयपणे खून केला.
यानंतर, स्वतः राहुल वाशिम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घटना कबूल केली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा फाटा परिसरात जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी डीवायएसपी मनिषा कदम, संतोष खराडे, ठाणेदार शक्करगे, पोलीस अधिकारी जारवार, फूसे, जाधव आदी पोहोचले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना ऐकून परिसरातील नागरिक हादरले असून, दोन निष्पाप बालिकांचा जीव वादातून गेला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!