साखरखेर्डा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; विजेच्या कडकडाटात शेतकऱ्याची गाभण म्हैस ठार!

मेहकर तालुक्यातील चायगाव येथे वीज पडून ७५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू: अवकाळी पावसाचा तडाखा!

साखरखेर्डा (सचिन खंडारे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदा २७ मे २०२५ रोजी दुपारी सिंदखेडराजा तालुक्यातील उमणगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसादरम्यान वीज कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे एका शेतकऱ्याची गाभण म्हैस जागीच ठार झाली. या घटनेने शेतकऱ्याला आर्थिक आणि भावनिक धक्का बसला आहे.

उमणगाव येथील शेतकरी अरुण रामकृष्ण गायकी यांच्या शेतात बांधलेली गाभण म्हैस पावसाच्या वेळी विजेच्या तडाख्यात सापडली. वीज कोसळताच ती जागीच मृत्यूमुखी पडली. ही म्हैस गाभण असल्याने शेतकऱ्याला केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर भावनिक आघातही सहन करावा लागला आहे. या म्हशीच्या मृत्यूमुळे अरुण गायकी यांचे सुमारे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी आनंद राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार केला असून, तो शासकीय मदतीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

साखरखेर्डा परिसरात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांचे नुकसान, पशुधनाला धोका आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!