मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र; सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले

मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र; सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द गावचे सरपंच रमेश अवचार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गोडाऊन बांधल्याप्रकरणी आणि त्याचा गैरवापर केल्यामुळे सरपंचपदावरून अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण आदेश अपर जिल्हाधिकारी खांदे यांनी २१ जुलै २०२५ रोजी जारी केला आहे. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून, शासकीय जमिनीच्या गैरवापरावर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

STATE NEWS : रात्री शारीरिक संबंधं करताना पतीने पत्नीला खूश केलं नाही; रागाचा भरात पत्नीने पतीला…

मेरा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य असून, रमेश अवचार हे जनतेतून निवडून आलेले सरपंच होते. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ते ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते. मात्र, गावातील रहिवासी दीपक शिंगणे यांनी नऊ महिन्यांपूर्वी अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे रमेश अवचार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही तक्रार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४ (ज-३) अंतर्गत दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनुसार, रमेश अवचार यांनी चिखली ते देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्गावरील गावाच्या फाट्याजवळील शासकीय जमिनीवर (गट क्रमांक ३७) अतिक्रमण केले आहे. या जमिनीवर त्यांनी ९ चौकस मीटर क्षेत्रावर गोडाऊन बांधले. यापैकी २० x ६० चौरस फूट जागेवर दोन गाळे बांधून ते खेडेकर इलेक्ट्रिकल्स आणि खेडेकर कृषी केंद्र यांना भाड्याने दिले. तसेच, याच जागेवर त्यांनी महा ई-सेवा केंद्र सुरू केले आणि उर्वरित गोडाऊनचा वापर स्वतःच्या गरजेसाठी केला. विशेष म्हणजे, ही शासकीय जमीन नियमानुसार कोणत्याही प्रक्रियेशिवाय त्यांनी वापरली. तक्रारीत असा आरोप आहे की, अवचार यांनी ग्रामसेवक आणि तलाठ्यांशी संगनमत करून या अतिक्रमणाचे रेकॉर्ड आणि कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामसेवक आणि तलाठ्यांनीही त्यांची पाठराखण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

दीपक शिंगणे यांनी तक्रारीत असा युक्तिवाद केला की, रमेश अवचार यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शासनाची दिशाभूल केली आणि निवडणूक लढवून सरपंचपद मिळवले. अशा परिस्थितीत त्यांना सरपंचपदावर राहण्याचा कायदेशीर किंवा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली होती.

अपर जिल्हाधिकारी खांदे यांनी या प्रकरणाची सखोल सुनावणी घेतली. त्यांनी तलाठी रेकॉर्ड आणि खरेदी खतांचे अवलोकन केले असता, अतिक्रमणाची नोंद स्पष्टपणे आढळून आली. यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४ (१) (ज-३) अंतर्गत रमेश अवचार यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आदेश २१ जुलै २०२५ पासून लागू असून, त्यांना सरपंचपदावरून तात्काळ हटविण्यात आले आहे.

या खटल्यात तक्रारदार दीपक शिंगणे यांच्यावतीने वकील डी. आर. सदार यांनी, तर रमेश अवचार यांच्यावतीने वकील अल्पेश ठाकरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाने शासकीय जमिनीच्या गैरवापराविरुद्ध प्रशासन किती गंभीर आहे, हे दाखवून दिले आहे. तसेच, यामुळे ग्रामपंचायत स्तरावर पारदर्शकता आणि कायद्याचे पालन यावर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!