अपघातात ७० वर्षीय वृद्ध ठार, एक गंभीर जखमी..!

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – लभाण देव मंदिराजवळ कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज (२४ नोव्हेंबर) दुपारी घडली.

जवळखेड (ता. देऊळगावराजा) येथील तुकाराम अर्जुन गवई (वय ७०) आणि विनोद शिवाजी गवई हे दुचाकीवरून सावखेड तेजन फाट्याकडे जात होते. दरम्यान मेहकरकडून येणाऱ्या कारने वळणावर त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात तुकाराम गवई यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद गवई गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!