Advertisement Advertisement

आणीबाणी योद्ध्यांचा सन्मान: महायुती सरकारने दुप्पट केले मानधन, चिखलीत निर्णयाचे स्वागत… आ. सौ. श्वेताताई महाले पाटील!

आणीबाणी योद्ध्यांचा सन्मान: महायुती सरकारने दुप्पट केले मानधन, चिखलीत निर्णयाचे स्वागत... आ. सौ. श्वेताताई महाले पाटील!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आणीबाणीच्या काळात भारतीयांनी सहन केलेल्या प्रचंड त्रासाचे स्मरण म्हणून भारत सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. 25 जून 1971 रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा वापर करून या लोकशाही प्रधान देशांमध्ये आणीबाणी लादली.

लाखो लोकांना रातोरात तुरुंगात टाकण्यात आले, माध्यमांचा गळा दाबण्यात आला. अशा वेळेस या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात तुरुंगवास पत्करलेल्या लोकांनी या देशांमध्ये खरी लोकशाही जिवंत ठेवली आहे. त्यांच्या या भारतीय लोकशाहीवर असलेल्या उपकारांचे स्मरण महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.

मेरा बुद्रुक येथील युवा पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू!

त्यामुळे या लोकशाहीच्या कलंक असलेल्या आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी कारावास भोगलेल्या बंदीवानांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून त्यांच्या हयात जोडीदारालाही मानधन मिळणार आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्याविरोधात देशभरात राजकीय पक्षांसह संस्था, संघटनांनी लढा दिला. या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्यांना कारावास भोगावा लागला. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या योद्ध्यांना मानधनाची घोषणा करण्यात आली.

शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!

बंदीवानांच्या सन्मानार्थ 2018 मध्ये दरमहा मानधन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते.आता या मानधनात वाढ झाली असून एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा 20 हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या स्वागतार्ह निर्णयाबद्दल चिखली तालुक्यातील आणीबाणी योद्ध्यांनी आज सौ. श्वेताताई महाले यांची भेट घेऊन सत्कार केला आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारचे आभार व्यक्त केले. आणीबाणीविरुद्ध ज्यांनी तुरुंगवास सोसला ते सर्वश्री प्रल्हाद रामराव भुतेकर, पुंडलिक बाजीराव महाले, बलदेव सिंग जुलाल सिंग सपकाळ, बळीराम एकनाथ परिहार, रामदास कडूबा जोशी, साहेबराव संपत महाले, सहदेव नामदेव महाले, लक्ष्मण पुंडलिक सोळंकी, भगवान विष्णू करवंदे, देविदास किसन महाले, महेंद्र नागोराव गवळी या वेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!