मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)डोणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या प्रलंबित प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंभोरे (वय २२) यांना पोलिसांनी अखेर शोधून काढले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केलेल्या बारकाईने तपासानंतर दि. १४ नोव्हेंबर रोजी महाळुंगे एमआयडीसी, पिंप्री-चिंचवड, चाकण येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.जिल्ह्यातील सर्व अपहरण प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक कक्ष सक्रिय झाले. पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर व पीएसआय संजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मिळालेल्या माहितीवरून रात्रंदिवस प्रयत्न करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.शोधमोहीम यशस्वी करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, पीडित मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलगी शोधली; आरोपी चाकणमधून जेरबंद! डोणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई…














