किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)फेसबुकवर सकल माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या देऊळगाव कोळ येथील मूळ रहिवासी आणि सध्या चाकण (जि. पुणे) येथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रय कायंदे याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल माळी समाजाने केली आहे.
या संदर्भात किनगावराजाच्या ठाणेदारांना बुधवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकल माळी समाजाच्या वतीने तक्रार देण्यात आली. त्यामध्ये नमूद केले की, दत्तात्रय कायंदे याने समाजमाध्यमावर सकल माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि
किनगावराजा : ठाणेदारांकडे तक्रार देताना माळी समाजबांधव.
विकृत मजकूर पोस्ट करून समाजातील महिलांचा अपमान केला आहे. या कृतीमुळे संपूर्ण समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्वरीत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही
@
तक्रारीद्वारे देण्यात आला आहे. या तक्रारीवर नीलेश हरकळ, विनोद हरकळ, डॉ. शिवानंद जायभाये, डॉ. ज्ञानेश्वर नागरे, नितीन कायंदे, दिलीप जायभाये, केशव जायभाये, बद्रीनाथ कायंदे, अक्षय उबाळे, एस. आर. झोटे, सी. एन. उबाळे, के. डी. उबाळे, पी. यू. उबाळे, आर. आर. शिनगारे, डी. बी. शिनगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत












