दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..

दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अजिंठा मार्गावरील पाडळी-पळसखेड रस्त्यावर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दुचाकीने कावड यात्रेकरूंना जोरदार धडक दिली. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून, तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटसाठी फक्त १० दिवस शिल्लक; १५ ऑगस्टनंतर होणार थेट दंडात्मक कारवाई!

मिळालेल्या माहितीनुसार, गुळभेली गावातील ग्रामसेवक नागपुरे यांच्या पुढाकाराने नव्याने बांधलेल्या शिवमंदिरासाठी कावड यात्रा काढण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी ७ वाजता ही यात्रा बुधनेश्वर येथे पैनगंगा नदीतून पाणी आणण्यासाठी निघाली होती. रात्री १२ वाजता आरती झाल्यानंतर यात्रेकरू परतीच्या वाटेवर होते.

दरम्यान, पळसखेड नागोच्या जवळ मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकी (एमएच २८ बी.झेड. ५२७४) ने यात्रेत चालणाऱ्या कावडधारकांना धडक दिली. अपघातात मुकेश राठोड आणि योगेश चव्हाण हे कावडधारक जखमी झाले, तर दुचाकीवरील ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे दोघेही गंभीर जखमी झाले.

हे चौघेही बुलडाण्यातील मुठे लेआऊट येथील रहिवासी असून, कावड यात्रेत सहभागी होते. पायी प्रवासामुळे थकलेल्या ऋषिकेश व मनोजने दुचाकीने परतीचा मार्ग धरला होता. मात्र, रात्री रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे त्यांनी दुचाकी वेगात चालवली आणि अपघात झाला.

सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुकेश राठोड याचा मृत्यू झाला असून, उर्वरित तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!