देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली मार्गावरील आळंद शिवारात शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव नीलेश गणेश मुंढे (वय २२, रा. असोला जहांगीर) असे आहे. नीलेश हा आपल्या दुचाकीवर (एमएच-२९-बीव्ही-०३४१) देऊळगाव मही येथून असोला जहांगीरकडे जात असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून नीलेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की नीलेश रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत असोला जहांगीरचा तरुण ठार….
Published On: October 15, 2025 11:05 am













