The Wall Review: एक पडकी भिंत, भग्न वाहन अवशेष, कचऱ्याचा मोठा ढिगारा असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटू देत नाही.

The Wall Review: एक पडकी भिंत, भग्न वाहन अवशेष, कचऱ्याचा मोठा ढिगारा असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटू देत नाही.

The Wall Review: (द वॉल) कोणतेही खास स्पेशल इफेक्ट्स किंवा महागडे व्हीएफएक्स न वापरता तसेच शूटिंगसाठी शब्दशः एकच सेट वापरूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे थ्रिलर बनवण्याचे कसब फक्त हॉलिवूडच्या फिल्म प्रोड्यूसर्सकडेच आहे. त्यांच्या याच स्कीलचा अनुभव अमेझॉन स्टुडिओजच्या 2017 सालच्या निर्मिती ‘द वॉल’ मधून येतो.

The Wall Review: कथा आणि दिग्दर्शन

अमेरिकन सेनेच्या इराकमधील कारवाईची पार्श्वभूमी असलेल्या ‘द वॉल’ ची स्टोरी ड्वेन वॉरेलने लिहिली असून, दिग्दर्शन डग लिमनचे आहे. विशेष म्हणजे, पावणे दोन तासांच्या या फिल्ममध्ये एरन टेलर आणि जॉन सीना यांनी निभावलेली अमेरिकन सैनिकांच्या रूपातील दोनच पात्रे दृश्य स्वरूपात आहेत.

कथानकाचा थरार

इराक युद्ध संपण्याच्या मार्गावर असताना, अमेरिकन आर्मीतील स्टाफ सार्जंट स्नायपर शेन मॅथ्यूज आणि सार्जंट अ‍ॅलन आयझॅकवर एक खास मोहीम सोपवली जाते.

त्यांना युद्धभूमीच्या ठिकाणी एका पाइपलाइन कन्स्ट्रक्शन साइटवर जाऊन कंत्राटदार, कर्मचारी, सिक्युरिटी स्टाफ अशा डझनभर लोकांचे जीव घेणाऱ्या इराकी स्नायपरला शोधून संपवण्याची जबाबदारी दिली आहे.

हे दोघे त्या ठिकाणी गुपचूप पोहोचून एका छोट्या टेकडीवरून एका जागेवर बसून तब्बल 22 तास टेहळणी करतात. पण त्यांना इराकी स्नायपरचा नामोनिशाणही आढळून येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणावरून स्नायपर निघून गेल्याचे समजून मॅथ्यूज लपण्याच्या ठिकाणावरून बाहेर पडून साइटकडे जाऊ लागतो.

तितक्यात अज्ञात ठिकाणाहून अचानक फायरिंग सुरू होऊन मॅथ्यूजच्या मांडीत एक गोळी घुसते. आयझॅकही मॅथ्यूजला वाचवण्यासाठी बाहेर पडून त्याच्या दिशेने पळू लागतो. पण त्याच्याही उजव्या गुडघ्यात इराकी स्नायपरची गोळी घुसते आणि तो जखमी होतो.

त्याच्याकडील रेडिओचेही नुकसान होते आणि पाण्याची बाटलीही सांडते. आता मॅथ्यूज रस्त्यावर जखमी अवस्थेत तळपत्या उन्हात निपचित पडलेला आहे, तर आयझॅक कसाबसा एका मोडकळीस आलेल्या भिंतीच्या आड लपण्यात यशस्वी होतो. ही भग्नावस्थेतील भिंतच आता आयझॅकची कर्मभूमी आहे.

अज्ञात ठिकाणी लपून राहिलेला इराकी स्नायपर आयझॅकच्या रेडिओवर संपर्क करून आपण अमेरिकन अधिकारी असल्याचे खोटे सांगतो. पण त्याच्या इराकी उच्चारांच्या इंग्रजीमुळे आयझॅक लगेचच ही लबाडी पकडतो.

त्यावेळी आयझॅकच्या लक्षात येते की, आपल्याशी संवाद साधणारा तो इराकी स्नायपर जुबा नावाचा रहस्यमय अतिरेकी आहे. जुबाने शेकडो लोकांना आणि अमेरिकन जवानांना आपल्या गोळ्यांचे शिकार बनवले आहे.

जुबा आयझॅकशी मैत्री करण्याचा बहाणा करून अमेरिकन सेनेच्या तळाची माहिती मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. इकडे आयझॅक जुबाला बोलण्यात गुंतवून आपल्या रेडिओची जुगाडाद्वारे दुरुस्ती करतो.

त्याने मदतीसाठी हेडक्वार्टरशी संपर्क केला असता त्याला समजते की, हेलिकॉप्टर रेस्क्यू टीम आयझॅक आणि मॅथ्यूजची सुटका करण्यासाठी आधीच रवाना झाली आहे. इकडे मॅथ्यूज शुद्धीवर येत असल्याचे दिसताच आयझॅक हळूवार आवाजात जुबा स्नायपर रस्त्याकडच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कुठेतरी लपून बसल्याची माहिती देतो.

मॅथ्यूज कसाबसा आपली रायफल सांभाळून आयझॅकने सांगितलेल्या दिशेने फायर करतो. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही, उलट विरुद्ध दिशेने आलेल्या दोन गोळ्याच मॅथ्यूजचा जीव घेतात.

आपला जीवाभावाचा सहकारी आपल्या चुकीमुळे ठार झाला असल्याचे आयझॅकच्या मनास लागते आणि आता तो कोणत्याही परिस्थितीत जुबाला संपवण्याचा निश्चय करतो.

क्रूरकर्मा जुबा आयझॅकचा हा निर्धार यशस्वी होऊ देणार का? रेस्क्यू टीमला बोलावण्यामागे जुबाचा नेमका काय डाव आहे? संपूर्ण फिल्ममध्ये फक्त रेडिओवरील आवाजावरून अस्तित्व दाखवणारा जुबा प्रत्यक्षात समोर दिसणार का? या प्रश्नांची अनपेक्षित आणि धक्कादायक उत्तरे फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये मिळतात.

एक पडकी भिंत, भग्न वाहन अवशेष, कचऱ्याचा मोठा ढिगारा, रस्त्यालगतची झुडपे, एक हेलिकॉप्टर इतकीच मर्यादित लोकेशन्स असलेला हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटू देत नाही.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “The Wall Review: एक पडकी भिंत, भग्न वाहन अवशेष, कचऱ्याचा मोठा ढिगारा असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटू देत नाही.”

Leave a Comment

WhatsApp Join Group!