चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)आजकाल हजार–दोन हजार रुपयांच्या कामाचा वर्षभर गवगवा केला जातो. मात्र त्याला अपवाद ठरत खऱ्या अर्थाने निस्वार्थ सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे सौ. पूजा ताई गजानन जाधव. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून त्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी भरीव काम करत आहेत.
आपल्या शालेय जीवनातील अडचणी आणि परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत त्यांनी “गाव तिथे अभ्यासिका” हा संकल्प मनाशी धरला. या संकल्पातून आजपर्यंत त्यांनी स्वखर्चातून 14 गावांमध्ये वाचनालये सुरू केली असून, या अभ्यासिकेच्या माध्यमातून ११३ विद्यार्थी आज सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. संपूर्ण तालुक्यात गावोगावी अभ्यासिका उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
२६ जानेवारी रोजी गणतंत्र दिन व त्याच दिवशी वाढदिवस असतानाही त्यांनी केक, हार-तुरे किंवा भेटवस्तूंचा मार्ग न निवडता थेट समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेतला. चिखली तालुक्यातील हातणी परिसरातील हातणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या ध्वजारोहण साठी हजर होत्या प्रसंगी त्यांना बोलण्याची संधी मिळाली …तेव्हा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना काय हवे आहे, असे विचारल्यावर विद्यार्थ्यांनी “शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर”ची मागणी केली. क्षणाचाही विलंब न करता सौ. पूजा ताईंनी शाळेसाठी आरो फिल्टर भेट दिला.
दर दोन–तीन महिन्यांत अशा विविध सामाजिक उपक्रमांतून त्या ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने काम करत आहेत. कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्धी न मिळवता, कुठलाही गाजावाजा न करता सुरू असलेले हे कार्य आज ग्रामीण जनतेतून मोठ्या कौतुकास पात्र ठरत आहे. अशा सामाजिक कार्यकर्त्या समाजात टिकल्या पाहिजेत, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास श्री प्रकाश जाधव (मारोती संस्थान अध्यक्ष), गोपाल राजपूत (शासकीय कंत्राटदार),तुकाराम जाधव, भगवान जाधव, मोहनसिंग जाधव, विकास जाधव सर, सुभाष जाधव, दिपक राणा,गजानन परीहार, अनिल जाधव सर,कापरसिंग पाटील,कौतिकराव जाधव,अनंथा जाधव, बालू मामा,गोपाल परिहार,प्रा. इंगळे सर, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक, राहुल जाधव (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













