बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा–मलकापूर महामार्गालगत असलेल्या गुलाबचंद नगर परिसरात आज (रविवार, ७ डिसेंबर) दुपारी एका पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
ही विहीर बिनीश्याम अग्रवाल यांच्या शेतात आहे. स्थानिक नागरिकांना विहिरीत काहीतरी तरंगताना दिसले, त्यांनी लगेच शहर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.











