माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गंभीर आरोप..! “सूडाचे राजकारण; मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न”…!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवरील चौकशीचे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय गदारोळ माजवत आहे. ही चौकशी ही हेतुपुरस्सर आणि सूडबुद्धीने सुरू करण्यात आली असून “मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एका कार्यक्रमात केला.

सरकारवर थेट टीका….!

सिंदखेड राजा मतदारसंघातील काही लोकांच्या सांगण्यावरून ही कारवाई होत असल्याचा आरोप करत ते म्हणाले….. “जिल्हा बँकेच्या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार नाही. अनेक चौकशीतून हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने मला आधीच क्लीनचिट दिली असतानाही दोन–चार खबऱ्यांनी चुकीची माहिती वरिष्ठ नेत्यांना देऊन ही चौकशी पुन्हा सुरू केली आहे.”

ते पुढे म्हणाले….“माझा वाढता जनाधार काहींच्या पचनी पडत नाही. त्यामुळे सूडबुद्धीने मला राजकीयरीत्या संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

राजकीय वातावरण तापले…!

या आरोपांनंतर बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. समर्थकांनीही सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ही चौकशी राजकीय दडपशाहीचा भाग आहे का, याबाबतही चर्चा रंगत आहे. आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना पलटवार…!

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या “वय झालं की थांबायचं असतं” या टीकेला उत्तर देताना शिंगणे म्हणाले…..“थांबायचं की पुढे जायचं हे जनता ठरवते. माझी ताकद जनतेत आहे. तुम्ही मात्र पदाच्या जोरावर लोकांवर टीका करता. तुमच्या घरातील लोकसभेतील पराभवांवर आधी विचार करा. आम्ही जमिनीवर काम करतो, तुम्ही सभांमध्ये आरोप करता.” “एका वर्षात मतदारसंघात काय विकास केला? त्याचा हिशोब द्यायची तयारी असेल तर द्या!”

विरोधकांना ठणकावलं….

शरद पवारांविषयी बोलताना शिंगणे म्हणाले “पवार साहेबांनी मला अनेक पदे दिली. पडत्या काळात त्यांना सोडून जाणे मला मान्य नाही. मी घाबरणार नाही. लोकांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. दडपशाहीसमोर झुकणारा मी नाही.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!