अज्ञात कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जखमी; बुलढाणा शहरात गुन्हा दाखल…

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात एका निष्काळजी चालकामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात सोमवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता कारंजा चौक–तेलगू नगर मार्गावर भारतमाता पुतळ्याजवळ घडला.

दीपक रामदास वैरागडे (वय ४२, रा. धामणधरी) हे त्यांच्या दुचाकी क्रमांक MH 28 AM 7846 ने पत्नी, मुलगी आणि भावाच्या मुलीला घेण्यासाठी जात होते. ते भारतमाता पुतळ्याजवळ पोहोचताच पांढऱ्या रंगाच्या कारने (MH 28 – 3469, पूर्ण नंबर नक्की माहित नाही) त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.

धडक इतकी जबरदस्त होती की वैरागडे यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला, उजव्या हाताच्या करंगळीला आणि पायाला दुखापत झाली. धडक दिल्यानंतर कारचालक कारसह पळून गेला.

याप्रकरणी दीपक वैरागडे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहेका गजानन जाधव हे मापोनि साहेबांच्या आदेशानुसार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!