तरुणाने केली आत्महत्या, वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली तर हिवरखेड शिवारात शेतातील विहिरीत पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ३ डिसेंबर रोजी घडल्या असून प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तालुक्यातील निमकवळा येथील रहिवासी लक्ष्मण नामदेव भोसले (क्य ३०) या तरुणाने विष औषध प्राशन केले. त्यामुळे त्याला उपचारार्थ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाने कोणत्या कारणांमुळे विष प्राशन करुन आत्महत्या केली, हे स्पष्ट होऊ

शकले नाही. याबाबत शासकीय रुग्णालयाचे डॉ. सलीम यांच्या वतीने कक्ष सेवक यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हे प्रकरण पिंपळगावराजा पोलिसांकडे वर्ग केले आहे. पुढील तपास पोहेकाँ बोरसे हे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील हिवरखेड येथील मनोरमा हसनराव देशमुख (वय ८५) ही वृध्द महिला गाव शिवारातील विहिरीत पाय घसरुन पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. अशी तक्रार सुदर्शन अशोकराव देशमुख यांनी हिवरखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हिवरखेडचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!