मेहकर फाटा जवळ थरारक अपघात…! फोर व्हीलरचा चुराडा, एकाचा जागीच मृत्यू…; दुसरा किरकोळ गंभीर…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली ते देऊळगाव राजा रोडवर मेहकर फाटा परिसरात आज सायंकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. XVV 700 असे नाव लिहिलेली आणि MH 28 BW 9394 नंबरची फोर व्हीलर गाडी देऊळगाव राजा दिशेने जात असताना अचानक कसा घडला हे कळलं नाही…

गाडीत दोन जण प्रवास करत होते. त्यापैकी ऋषिकेश काटे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा वैभव जाधव किरकोळ जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे…

गाडीवरील नंबरवरून ही गाडी मेहकर येथील ‘काटे’ यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी चिखली पोलिस स्टेशन चे गजानन काकडे व प्रशांत जायभाये पोहचले होते…मोठी गर्दी झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!