BREAKING: जिल्हा परिषद निवडणूक पुढच्या वर्षी होणार…! मार्च किंवा एप्रिल नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होईल…?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)राज्यातील नगरपरिषदांसाठी आज, २ डिसेंबरला मतदान पार पडले. तर निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकलेल्या नगरपालिकांमध्ये आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. उद्या ३ डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार होते; मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निकाल प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता २०२५ मध्ये कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाहीत. त्या थेट पुढच्या वर्षीच होणार आहेत. दरम्यान, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतील.यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या–दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता कमी असून त्या थेट एप्रिलमध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे दोन महानगरपालिका आणि १७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका अडचणीत अडकल्या आहेत. त्यात महानगरपालिका निवडणुकांचे आरक्षण पुनर्वाटप करणे तुलनेने सोपे असल्याने २९ महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितही होऊ शकतात.मात्र, ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या निवडणुका पुढे जाणार हे स्पष्ट झाले आहे.तसेच, नगरपालिकांचे निकाल २१ डिसेंबरपर्यंत लांबल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. जोपर्यंत हे अधिकारी आपल्या कर्तव्यातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत पुढील निवडणुका घेता येणार नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाकडे ३१ जानेवारीच्या मुदतीत वाढ देण्याची मागणी करण्याची तयारी करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!