मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील पुन्हई गावातील २४ वर्षीय शेतकरीपुत्र सुबोध भगवान धुरंधर यांनी गुरुवारी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. अचानक प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी उपचार सुरू केले असले तरी प्रकृती खालावत गेली आणि अखेर २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सुबोध यांचे निधन झाले. तरुण वयात झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावातही शोककळा पसरली आहे.
घटनेची नोंद बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीत झाली असून बुलढाणा शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.













