चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपने अधिकृतपणे रणशिंग फुंकले असून, नगराध्यक्षपदासाठी अनुभवी आणि कामगार नेता पंडितराव देशमुख यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यांच्या नावानेच चिखली शहरात चर्चेला उधाण आले आहे.पंडितराव देशमुख हे दीर्घकाळ नगरसेवक म्हणून कार्यरत असून प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, पथदिवे अशा मूलभूत सोयीसुविधांच्या विकासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः स्मशानभूमीचे केलेले उत्कृष्ट सौंदर्यीकरण हे त्यांचे ठळक काम ठरले असून नागरिकांनीही त्याचे मोठे कौतुक केले आहे.आमदार श्वेताताई महाले यांच्या सहकार्याने शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस श्री. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शहराला नवी उंची देणे, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांचे लक्ष केंद्रित मुद्दे आहेत.निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी शहरातील मुख्य समस्या आणि त्यावरील उपाय मांडले आहेत. त्यामध्ये—शहरातील सर्व रस्त्यांचे आधुनिकीकरणसांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणेनियमित व शुद्ध पाणीपुरवठाकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आधुनिक रूपसार्वजनिक उद्याने व हिरवळींचा विकासवृक्षारोपण मोहिमेला गतीअनुभव, सामाजिक बांधिलकी आणि सहकार क्षेत्रातील त्यांची प्रतिमा या जोरावर पंडितराव देशमुख ही निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि आमदार श्वेताताई महाले यांचा मिळालेला ठाम पाठिंबा पाहता ते नगराध्यक्षपदासाठी एक मजबूत पर्याय म्हणून पुढे आले आहेत.
विकासाच्या मुद्द्यांवर भाजपचा विश्वास; पंडितराव देशमुखांची चिखली मध्ये नगराध्यक्षपदासाठी रिंगणात…













