खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) अलीकडे इयत्ता १० वीच्या जुने विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर कार्यक्रम वाढू लागले आहेत. अशाच एका कार्यक्रमातून जुने वर्गमित्र व मैत्रिणी एकत्र आल्याने त्यांच्यातील ओळख पुन्हा वाढली. मात्र या ओळखीचे गंभीर दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.या गेट-टुगेदरनंतर तयार झालेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून शैलेद्रसिंग हनुमानसिंग राजपूत (वय ३७) याची त्याच्या ३७ वर्षीय विवाहित वर्गमैत्रिणीसोबत पुन्हा ओळख झाली. त्याने तिच्या वैयक्तिक नंबरवर मेसेज करत संपर्क वाढवला. पुढे WhatsApp चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणला.या दबावाखाली २ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान आरोपीने तिच्यासोबत पाच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिला ६४ हजार रुपये देण्यास भाग पाडले.यानंतर १३ नोव्हेंबर रोजी आरोपीने पुन्हा फोन करून अंगठी व पोत मागितले. अन्यथा “तुझ्या पतीचा खून करीन” अशी धमकी दिली. याच दिवशी तिच्या पतीलाही फोन करून ४ लाख रुपये नाही दिले तर तुझ्या पत्नीचे फोटो-व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली.यामुळे पीडित विवाहित शेवटी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि संपूर्ण घटना सांगितली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शैलेद्रसिंग राजपूत विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६२(२)(ड), ३०८(२), ७७, ७८(१), ३३३ नुसार गुन्हा नोंदवला.
गेट-टुगेदरमधील ओळखीचे गंभीर परिणाम; विवाहितेची ब्लॅकमेलिंग व लैंगिक शोषण..!
Published On: November 16, 2025 6:59 pm












