अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
१० नोव्हेंबर रोजी राहुल आंबेकर (रा. हिवरा राळा, ता. बदनापूर, जि. जालना) याने एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवले. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून चंदनझिरा पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. अखेरीस राहुल आंबेकर आणि पीडित मुलगी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
१४ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करून १५ नोव्हेंबरला चिखली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे करत आहेत.












