भरधाव जाणाऱ्या ट्रकने दिली दुचाकीला धडक; वडिलांसह मुलाचा झाला मृत्यू…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना पिंपळगावराजा भालेगाव रोडवर गुरुवारी १३ नोव्हेंबरला दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.तालुक्यातील कवडगाव येथील गणेश शेषराव जाधव वय ३१ हे एम. एच. २८ ए., एल. ३७४५ या क्रमांकाच्या दुचाकीने मुलगी सपना, मुलगा आयर्न, अरुण व रुद्र यांना घेऊन जात असताना पिंपळगावराजा भालेगाव रोडवर ट्रक चालक शेख मुराद शेख गफार क्य ६५ याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, या अपघातात वडील गणेश जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सपना, आयर्न, अरुण व रुद्र ही चारही मुले जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतात ग्रामस्थांसह पिंपळगावराजाचे ठाणेदार भागवत मुळीक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ येथील खासगी रुग्णालयात हलवले. परंतु उपचार सुरू असताना ६ वर्षीय आर्यन जाधव याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांवर उपचारसुरू आहेत. अपघातानंतर ग्रामस्थ मारतील, या भीतीने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आणि पिंपळगावराजा पोलिस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणी बळीराम रतन चव्हाण रा. बेलखेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगावराजा पोलिसांनी ट्रकचालक शेख मुराद शेख गफ्फार याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार भागवत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर बर्वे हे करीत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वडील व मुलाच्या मृतदेहाचे शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी येथील सामान्य रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केले. त्यानंतर मृतकावर कवडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती कवडगाव येथे कळताच गावात शोककळा पसरली होती. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!