नांदुरा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज)नांदुरा तालुक्यातील विटाळी (धानोरा) परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री थरार मांडत बकऱ्या चोरून नेल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शेतकरी समाधान निंबाजी बोदवडे यांच्या गोठ्यातील ९ बकऱ्या आणि ५ बोकड चोरट्यांनी बलेनो कारमध्ये कोंबून पळवून नेले.ही घटना १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचे स्पष्ट दृश्य कैद झाले आहे. ११ नोव्हेंबरला पहाटे २:०३ वाजता बलेनो गाडीत बकऱ्या भरून चोरटे पसार झाल्याचे फुटेजमध्ये दिसते.शेतकऱ्यांच्या मते, चोरी गेलेल्या जनावरांची अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांची किंमत आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास मुके करीत आहेत.
विटाळी परिसरात चोरट्यांनी बलेनो कारमध्ये कोंबून १४ बकऱ्या चोरल्या; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..!














