बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की तो रस्ता अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालक त्रस्त आहेत, तर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले असले तरी ते फक्त दहा टक्केच पूर्ण झाले असून, उर्वरित काम ठप्प झाले आहे. याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शेळगाव आटोळ सर्कल नेते डॉ. विकास मिसाळ, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील आणि बोर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावरून दररोज शेकडो शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक प्रवास करतात. परंतु खड्डे आणि उखडलेला डांबर यामुळे अनेक अपघात घडले असून, प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. मिसाळ यांनी सांगितले की,“लोकांच्या जीवाशी खेळणारे हे दुर्लक्ष असह्य आहे. रस्त्याचे काम २४ नोव्हेंबरपूर्वी सुरू झाले नाही, तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीत मिसाळ वाडी फाटा जवळ उपोषण करणार आहोत.”
शेळगाव आटोळ–देऊळगाव घुबे रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; रस्ता दुरुस्ती थांबल्याने संताप उसळला!राष्ट्रवादी नेते डॉ. विकास मिसाळ यांचा इशारा – २४ नोव्हेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास थेट उपोषण!














