सुंदरखेडमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरास अटक…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील सुंदरखेड परिसरात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरावर आरोग्य विभागाने धाड टाकत कारवाई केली. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईत पोलिसांनी संबंधित डॉक्टराला अटक केली आहे.
गर्भलिंग निदान हा कायद्याने गुन्हा असूनही सुंदरखेड परिसरात हे काम मागील काही महिन्यांपासून गुप्तपणे सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकाच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत एम.डी. नेचरोपॅथिक डॉ. कैलास गवई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या राहत्या घरातच हे अवैध गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, या अवैध धंद्याद्वारे संबंधित डॉक्टराने परिसरात तीन मजली इमारत बांधल्याची आणि लाखो रुपयांची मालमत्ता जमवल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!