दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून दुसरबीडला जात असतांना समृद्धी महामार्ग उड्डाण पुलाच्या रींगरोडला धडकून दोन मोटारसायकलस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री शुक्रवारी घडली. अपघात इतका भयंकर होता कीvमोटारसायकलचे अक्षरशः तीन तुकडे झाले तर घटनास्थळी रक्ताचा सडाच पडलेला होता.

याबाबतची हकीकत अशी की, स्थानिक तांबोळीपुरा येथील रहिवाशी शे.आरीफ शे. कादर (वय ३५) तसेच शे. अल्ताफ शे. अकरम (वय २७) हे दोघे मामे आतेभाऊ दि. ३१ ऑक्टोबरचे संध्याकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान मोटारसायकल क्र. एमएच २८ बीजे ४०५९ ने दुसरबीड येथील एका लग्नाच्या रिसेप्शनसाठी (वलीमा) जात होते. दरम्यान दुसरबीड हाकेच्या अंतरावर असतांनाच काळाने त्यांचेवर झडप घातली. त्यांची मोटारसायकल ही हॉटेल सात बरा जवळील समृद्धी उड्डाण पुलाच्या रींगरोडला धडकून त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनुसार अपघाताची तिव्रता इतकी भयानक होती की, दुचाकीचे अक्षरशः तीन तुकडे होऊन ते दोघे मृतक दूर फेकल्या गेले आणि त्यांचे डोक्याला जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाले. अपघातस्थळी जणू रक्ताचा सडाच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन दोन्ही मृतदेह लगेच सि. राजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी दोन्ही पार्थिवांचे स्थानिक मुस्लिम कबरस्थानात शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे तांबोळी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!