चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्री दरातील तफावत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, बुलढाणा जिल्हा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी चिखली तहसीलदार सतोष काकडे यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
या संदर्भात शेतकरी संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ. देविदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३० ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना चिखली तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन राज्यातील शेतकऱ्यांवरील ओढवलेल्या संकटाची सविस्तर माहिती दिली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असून, उत्पादन खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यासोबतच शेतीमालाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल.
शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले की “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घ्यावा आणि राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्तीचे स्वप्न साकार करावे.”
ही मागणी पत्राची प्रत मा. तहसीलदार, चिखली यांच्याकडेही सुपूर्द करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करावी.
- शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभावाची अंमलबजावणी करावी.
- सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा आदी पिकांच्या खरेदीसाठी केंद्रांनी तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करावी.
- अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंतची मदत द्यावी.
- पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून मदत वितरित करावी. या शेतकऱ्यांनी दिलें निवेदन
देताना देवीदास कणखर,एकनाथ पाटील, उध्दव पाटील,मुरली महाराज येवले,प्रकाश घुबे,प्रकाश अंभोरे,अच्युतराव पाटील,आत्माराम कुटे,एकनाथ दगडू थुट्टे ,मधुकर थुट्टे,राजू शेटे,विलास राऊत, गजानन वायाळ, भागवत थुट्टे,संदीप थुट्टे,रामेशवर थुट्टे,भगवान थुट्टे,वर्षा गाडेकर,शिवाजी थुट्टे,जगन्नाथ येवले,विष्णू थुट्टे, देवीदास भगत,गजानन थुट्टे,विठ्ठल थुट्टे,नामदेव थुट्टे,आलं भगवान नरवाडे, प्रकाश पवार,शिवाजी येवले,भागवत गाडेकर, सुधाकर भुसारी इत्यादी उपस्थित होते













