किनगाव राजा पोलिस ठाण्यातील वादाला वेगळं वळण : ठाणेदारांचा खुलासा — “युवकाने पोलिसांवर दबाव आणण्यासाठी विष प्राशन केलं”

    किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)काल रात्री किनगाव राजा सर्कल मध्ये एका व्यक्तीने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे...बैलजोडी चोरीची तक्रार देणाऱ्या युवकाला किनगाव राजाचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचा आरोप युवकाने केला होता. तसेच व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले होते. या प्रकरणी ठाणेदार संजय मातोंडकर यांनी संबधीत युवकाने पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याच्या भितीने विष प्राशन केल्याचे म्हटले आहे. तसेच आपण फिर्यादी युवकाल आपण मारहाण केली नसल्याचा

दावाही मातोंडकर यांनी केला आहे.

लिंगा देवखेड येथील पवन प्रल्हाद जायभाये या युवकाने आपली बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार किनगाव राजा पोलिसात दिली होती. तसेच कारवाई होत नसल्याने तसेच ठाणेदारांनी मारहाण केल्याचा आरोप करीत पवन जायभाये याने विष प्राशन केले होते. या घटनेवर किनगाव राजाचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, प्रल्हाद जायभाये आणि पवन जायभाये हे गावात कापूस खरेदीचा व्यवसाय करतात. या बापलेकांकडे अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे आहेत. कापसाच्या व्यवहारातून जऊळका येथील कारभारी सांगळे यांना बैलजोडी देण्यात आली होती. आर्थिक व्यवहार वाटल्याने हे प्रकरण तपासात ठेवले होते.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने पवन जायभाये युवकावर फसवणुकीचा गुन्हे दाखल होणार आहेत. या गुन्ह्यांमुळे घाबरलेल्या पवनने पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी विष प्राशन केल्याचेही ठाणेदार संजय मातोंडकर यांनी म्हटले आहे. या युवकाकडे अने शेतकऱ्यांचे पैसे असून ही रक्कम लाखात आहे. पाच ते सहा शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!