खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) अल्पवयीन मुलीचा
आई-वडील, नातेवाईकांनी विवाह लावून दिला. कालांतराने तिने एका बाळाला जन्म दिला. यावरून हा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून आई-वडीलांसह पती व इतर नातेवाईक अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातील १७ वर्ष ६ महिन्याच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला प्रथम
पिंपळगावकाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु शासकीय रुग्णालयाने तिला अकोला येथे उपचारार्थ हलवण्याचे सांगितले. त्या ठिकणी अल्पवयीन मुलीने एका मुलास जन्म दिला. प्रकरणी रुगणालय प्रशसनाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल विजयसिंग पावरा, रुपाली विजयसिंग पावरा, विजयसिंग पावरा (रा.इस्लामपूर), रेखाबाई दिनेश अवाया, दिनेश अवाया (रा. पिंपळगाव) काळेयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.













