मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील एक २५ वर्षीय विवाहिता घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या प्रकरणी विवाहितेचे सासरे पुंजाजी जगन्नाथ वराडे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे.
तक्रारीनुसार, प्रिया ऋषीकेश वराडे (वय २५) ही कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली. नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही.
बेपत्ता महिलेला सावळा रंग, अंगात पंजाबी ड्रेस असून उजव्या हातावर टॅटू आहे, असे वर्णन पोलिसांनी दिले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुपडासिंग चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल सदानंद हाडे हे करत आहेत.
टाकरखेड येथील विवाहिता बेपत्ता; पोलिसांत नोंद
Published On: October 19, 2025 12:48 pm













