बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा राजकारणात एक मोठा स्फोट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आणि माजी आमदार रेखा ताई खेडेकर यांनी आपल्या पदाचा धक्कादायक राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरात राजकीय खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा ताई खेडेकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हाती सुपूर्त केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात “वैयक्तिक कारणास्तव मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, कृपया माझा राजीनामा स्वीकारावा” अशी नम्र विनंती केली आहे.
रेखा ताईंचा हा निर्णय नेमका का घेतला गेला, याबाबत अधिकृत खुलासा झाला नसला तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. कारण, स्थानिक स्वराज्य निवडणुका अगदी काहीच दिवसांवर आल्या असताना हा निर्णय घेतला गेल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर मोठा परिणाम होणार, अशी चर्चा सुरू आहे.
Breaking राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखा ताई खेडेकर यांचा राजीनामा; जिल्हा राजकारणात खळबळ!
Published On: October 16, 2025 12:19 pm














