भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी चढला टॉवरवर

shetkari Tower andolan

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रशासनाच्या वतीने शेतात मशागत करण्यास मनाई करण्यात आल्याने त्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या बीएसएनएलच्या ३०० फुट उंच टावर वर चढत आंदोलन केले. हे आंदोलन रविवार ७ सप्टेबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान करण्यात आले. अखेर पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतकऱ्यांची समजूत घालुन त्याला खाली उतरवण्यात यश आल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी

मिळालेल्या माहिती नुसार बुलडाणा शहरापासून काही अंतरावर असलेल्या येळगाव येथील शेतकरी राजू काकडे याची शेती आहे. ही शेत जमीन शासनाने अधिग्रहीत केल्यामुळे त्यांच्याकडे फक्त सद्यःस्थितीत पाऊण एकर शेती शिल्लक आहे. ही शेती पिकवून राजू आपला चरितार्थ चालवतो, परंतू महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याने तांत्रिक अडचणीमुळे त्याला शेतात मशागत करण्यास रोखले आहे. परिणामी आता परिवाराचा चरितार्थ कसा चालणार या विवंचनेत अडकलेल्या काकडे याने रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बीएसएनएल टॉवरच्या

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

यावेळी आंदोलकांशी उपस्थितांनी संवाद साधला. नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, तहसीलदार पाटील, पोलिस निरीक्षक राठोड आणि अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी आंदोलन राजू काकडे यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू केले. तर यापुढील सदर शेतकऱ्याची न्यायदानाची प्रक्रिया सांभाळणार असल्याचे अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी जाहीर केल्याने शेतकऱ्याने आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती दिली.

सर्वोच्च शिखरावर चढून आंदोलन केले. रविवारी बाजार असल्याने या परिसरातून त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काकडे याला नाववरुन खाली उतरवण्यात प्रशासनाला यश मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी राठोड, जिल्हा प्रशासनाच्या वतीने गृह विभागाचे अधीक्षक हिवाळे, मुख्याधिकारी गणेश पांडे, यांच्यासह बीएसएनएलचे कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!