देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी दिग्रस रस्त्यावर घडली.

विठाबाई पुंडलिक बनसोडे (वय ५५, रा. देऊळगाव मही) या शेतात कामासाठी निघाल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या रस्त्याने चालत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विठाबाईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तातडीने त्यांना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

स्टॉक मार्केट ट्रेडिंग क्या यह आपके लिए करियर का सही विकल्प है?

या घटनेने देऊळगाव मही परिसरात शोककळा पसरली आहे. विठाबाईंच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे.

या प्रकरणी विठाबाईंचे नातेवाईक रामेश्वर पुंडलिक बनसोडे यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शींची माहितीही गोळा करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!